भंडारा जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन

भंडारा जिल्ह्यात विशेष शिबिराचे आयोजन

 

भंडारा, दि. 14 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी, 2023 या अर्हता दिनांकावर आधारीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 नुसार 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 हा कालावधी मतदार नोंदणीचा असून पुनरिक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने मतदार नोंदणीसाठी 4 विशेष शिबिरे 19 (शनिवार) व 20 नोव्हेंबर 2022 (रविवार) तसेच 3 (शनिवार) व 4 डिसेंबर 2022 (रविवार) रोजी जिल्हयातील मतदान केंद्रावर व मतदार नोंदणी कार्यालयात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

विद्यार्थ्यासाठी विशेष शिबिरे 16 नोव्हेंबर 2022 (बुधवार) व 23 नोव्हेंबर 2022 (बुधवार) रोजी जिल्हयातील महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 26 व 27 नोव्हेंबर 2022 या दोन दिवसामध्ये भटक्या व विमुक्त जमाती यांचे तांडे असणाऱ्या ठिकाणी विशेष शिबिरे आयोजन करण्यात येणार असून मतदान केंद्रावर मतदान केंद्र स्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरीकांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीपती के. मोरे यांनी केले आहे.