प्रलंबित वेतननिश्चिती प्रकरणांची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम

प्रलंबित वेतननिश्चिती प्रकरणांची पडताळणी करण्यासाठी विशेष मोहीम

भंडारा, दि. 10 : जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडील 31 मार्च 2023 पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक पडताळणीसाठी 16 ते 18 नोव्हेंबर 2022 या कालावधीत वेतन पडताळणी पथक, नागपूर द्वारा जिल्हा कोषागार कार्यालय, सामाजिक न्याय भवनाजवळ, सिव्हिल लाईन, भंडारा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण पु. पत्की यांनी केले आहे.