शिक्षक पात्रता परिक्षेतील गैरव्यवहार केलेल्यांना शास्ती

शिक्षक पात्रता परिक्षेतील गैरव्यवहार केलेल्यांना शास्ती

भंडारा, दि. 5 : सन 2019-20 मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत सायबर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्ह्याच्या तपासादरम्यान परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता त्या असे निष्पन्न झाले की, 7880 उमेदवार परीक्षेत गैरप्रकारात सामिल असल्याचे दिसून आले. म्हणजे प्रत्यक्षात ते अपात्र असतांना त्यांनी गैरप्रकार करून स्वत:स पात्र करून घेतलेले आहे.

शिक्षक पात्रता परीक्ष 2019 चा अंतिम निकाल दिनांक 28 जुलै 2020 रोजी परीक्षा परिषदेच्या संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात आला त्यानुसार एकूण 16705 उमेदवार पात्र ठरले होते. त्यापैकी 7500 उमेदवार गैरप्रकारामध्ये समाविष्ट असल्याचे निष्पन्न झाले. 293 उमेदवारांनी आरोपीसोबत संगनमताने बनावट प्रमाणपत्र प्राप्त करून घेतले आहे. तर उर्वरीत 87 उमेदवार हे आरोपींच्या संपर्कात असल्याचे आढळून आलेले आहे.

गैरप्रकारमध्ये समाविष्ट परीक्षार्थी/ उमेदवार यांचे विरूध्द परीक्षा परिषदेने शास्ती निश्चित केलेली आहे. सदर आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. असे शिक्षणाधिकारी एस.वाय.शर्मा यांनी कळविले आहे.