प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेकरीता शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पुर्वी ई-केवायसी करून घ्यावे – जिल्हाधिकारी संदीप कदम

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेकरीता शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पुर्वी ई-केवायसी करून घ्यावे – जिल्हाधिकारी संदीप कदम

भंडारा, दि. 23 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्हयातील पात्र लाभार्थी 2 लाख 12 हजार 983 पैकी 1 लाख 50 हजार 139 लाभार्थ्यांचे ई-केवायसी झालेले असून 62 हजार 844 लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणे शिल्लक आहे. तालुकानिहाय प्रलंबित शेतकरी संख्या मोठ्या प्रमाणावर असून त्यांनी ई-केवायसी करून घ्यावे.

भंडारा 14,808, पवनी 6,400, तुमसर 9,315, मोहाडी 8,455, साकोली 7,796, लाखनी 7,715 व लाखांदूर 8,355 असे एकूण 62,844 लाभार्थ्यांचे ई-केवायसी होणे शिल्लक आहे सदर लाभार्थ्यांची यादी Bhandara.gov.in या NIC च्या साईडवर उपलब्ध आहे. तरी लाभार्थ्यांनी सुविधा केंद्रावरून ई-केवायसी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत पुर्ण करून घ्यावी. ई-केवायसी करून न घेतल्यास शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता वितरीत करण्यात येणार नाही. तरी सर्व शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत ई-केवायसी करून घ्यावेत, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळविले आहे.