पंचायत समिती, गडचिरोली अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त विविध उपक्रमांचे आयोजन

पंचायत समिती, गडचिरोली अंतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमीत्त विविध उपक्रमांचे आयोजन

गडचिरोली,दि.12: दि. १२ ऑगस्ट २०२२ रोजी पंचायत समिती गडचिरोली येथे डॉ.देवरावजी होळी आमदार-गडचिरोली विधानसभा क्षेत्र, गडचिरोली यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव चे औचीत्य साधुन केंद्रीय पुरस्कृत प्रधानमंत्री व राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत उत्कृष्ठ ग्रामपंचायत सचिव, सरपंच, तथा लाभार्थी सत्कार सोहळा तसेच ध्वज वितरण सोहळा, स्वच्छता मोहिम,डेमो- हाउस चे उदघाटन, सेल्फी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी महाआवास अभियान २.० प्रधानमंत्री, राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत सन

२०२१-२२ मध्ये विहीत वेळेत घरकुल पुर्ण करण्या-या ग्रामपंचायत, सचिव, सरपंच, लाभार्थिचा सन्मान चिन्ह देऊन आमदार महोदयांचे हस्ते सत्कार करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व स्वराज्य महोत्सव

निमीत्त स्वच्छता मोहिम, ध्वज वितरण वृक्षारोपण, डेमो-हाउस चे उदघाटन व अमृत महोत्सव सेल्फी चे

अनावरण करण्यात आले.

सदर सत्कार सोहळा व उपक्रमाकरीता आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्यक्षते खाली माजी सभापती मारोतरावजी इचोडकर, माजी उपसभापती विलासरावजी दशमुखे, गट विकास अधिकारी धनंजय साळवे, श्री. फरांडे – महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पी. पी. पदा कृषी अधिकारी, .के.जी.बोपणवार, अमोल भोयर विस्तार अधिकारी, पंचायत समिती, गडचिरोली, कार्यालयीन सर्व अधिकारी/कर्मचारी वर्ग. सचिव, सरपंच, नागरीक, महिला इ. प्रामुख्याने हजर होते.

सदर कार्यक्रमाचे संचालन श्रीमती आकरे मॅडम, शिक्षीका जि.प.प्राथ.शाळा काटली, प्रदिप जे.बरई

(समन्वयक), पंचायत समिति गडचिरोली यांनी केले. जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा, चामोर्शी रोड,

गडचिरोली येथील शालेय विदयार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. व विस्तार अधिकारी (पं) के.जो. बोपणवार

यांनी आभार प्रदर्शन केले. कु.पातकमवार मॅडम, अधिक्षक, श्री.बेडके वि.अ.सांख्यीकी, अनमोल चंदनखेडे, स्था. अभियांत्रीकी, सुरज खोब्रागडे घरकुल ऑपरेटर, इ. नी आयोजनार्थ भुमीका बजावली. श्री. इचोडकर यांनी वंदे-मातरम गिताने सदर कार्यक्रमाची सांगता केली. असे गट विकास अधिकारी, पंचायत समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.