मनपा तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी 

मनपा तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी 

चंद्रपूर १ ऑगस्ट – वेदनांना साहित्यातून वाचा फोडणारे आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी झगडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती चंद्रपूर शहर महानगरपालिकेत आज उत्साहात साजरी करण्यात आली. मनपाच्या अधीकारी कर्मचारी यांनी प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केले.

याप्रसंगी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाची माहिती देण्यात आली. कार्यक्रमास रफिक शेख, भूषण ठाकरे,विकास दानव, माधवी दाणी,गुरुदास नवले,अनिल बनकर, संजय बेले, प्रदीप मडावी, विजय भुरकुंडे,संजय चौधरी,चिंतेश्वर मेश्राम, डांगे यांनीही प्रतिमेस अभिवादन करून पुष्प अर्पण केले.