“हर घर तिरंगा” निमित्त निबंध स्पर्धा मनपातर्फे रोख बक्षीसे १० ऑगस्ट अंतिम तारीख  

“हर घर तिरंगा” निमित्त निबंध स्पर्धा मनपातर्फे रोख बक्षीसे १० ऑगस्ट अंतिम तारीख  

चंद्रपूर १ ऑगस्ट – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा मोहीम जनजागृतीसाठी चंद्रपूर महानगरपालिका व चंद्रपूर बचाव संघर्ष समिती मार्फत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.

या निबंध स्पर्धेअंतर्गत रोख बक्षिसे देण्यात येणार असुन प्रत्येक गटाला प्रथम रु. ३०००/- द्वितीय रु. २०००/- तृतीय रु. १०००/- तसेच ५ प्रोत्साहनपर बक्षिसे ( ( स्कुल – कॉलेज बॅग ) व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. स्पर्धा वर्ग ५ ते ८ तसेच वर्ग ९ ते १२ या दोन गटात घेण्यात येणार आहे.

निबंध मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत देता येणार असुन वर्ग ५ ते ८ या गटासाठी विषय १. मेरा तिरंगा मेरा अभियान २. तिरंगे का इतिहास, तर वर्ग ९ ते १२ या गटासाठी विषय १. देशाच्या प्रगतीत युवकांचे योगदान २. भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वर्ष. असे स्पर्धेचे विषय आहेत.

शालेय विद्यार्थ्यांनी निबंध लिहुन शाळेमार्फत अथवा स्वतः चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात १० ऑगस्ट २०२२ पुर्वी जमा करावयाचे आहेत त्यानंतर आलेले निबंधाचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.

अधिक माहितीसाठी मनपा शिक्षण विभाग तसेच डॉ. गोपाल मुंधडा – ९४२२८३९४७९, डॉ. मो. जिलानी – ९८५०३६२६०८, डॉ. श्याम धोपटे – ९८२२३६३९११, श्रीमती वनश्री मेश्राम – ९८३४२८८९०५, श्रीमती क्रांती देवधरे – ९६०४७६५५७७ येथे संपर्क करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.