रिक्त पदे भरण्याबाबत कालबद्ध आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

रिक्त पदे भरण्याबाबत कालबद्ध आराखडा तयार करावा – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

             मुंबईदि. 28 : वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वर्ग 1 आणि वर्ग 2 ची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत असून याबाबत कार्यवाही सुरु आहे. मात्र वर्ग 3 आणि वर्ग 4 ची रिक्त पदे विभागामार्फत भरण्यात येणार असल्याने रिक्त पदे भरण्याबाबतचा कालबध्द आराखडा दोन्ही विभागामार्फत तयार करण्यात यावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले.
            श्री.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात दोन्ही‍ विभागांच्या रिक्त पदांबाबतचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजयवैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंहफिल्मिसिटीचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारेवैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकरसांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात व अन्य अधिकारी उपस्थित होते.
            श्री. देशमुख म्हणाले कीदोन्ही विभागांतील रिक्त पदांचा संख्या पाहता ही रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. रिक्त पदे भरीत असताना ही पदे कशा पध्दतीने भरण्यात येतील याबाबत आराखडा तयार करण्यात यावा. पदे भरीत असताना परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेची निवड कशा पध्दतीने करण्यात येणार आहेज्या पदांची भरती करण्यात येणार आहे त्या पदांचे भरती नियम याबाबत सर्व नियोजन करण्यात यावे. तसेच विभागाचा आढावा घेताना पदोन्नतीविभागाचा आकृतीबंध या सगळया बाबी तपासून घेण्याचे निर्देशही यावेळी दिले.