26 जून रोजी 14 व 16 वर्षाखालील मुला-मुलींची फुटबॉल निवड चाचणी

26 जून रोजी 14 व 16 वर्षाखालील मुला-मुलींची फुटबॉल निवड चाचणी

Ø जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.22 जून: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत क्रीडा प्रबोधिनी, पुणे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने व फुटबॉल खेळाच्या प्रशिक्षणाकरीता तसेच संघ उभारणीकरीता नव्याने खेळाडू भरती करण्यात येणार आहे. याकरीता नागपूर विभागातील 14 व 16 वर्षाखालील खेळाडूंचे निवड चाचणीचे आयोजन दि. 25 ते 26 जून 2022 रोजी सकाळी 7 वाजता नेहरू स्टेडियम,अमरावती येथे करण्यात येणार आहे.

14 वर्षाखालील खेळाडूंची जन्मतारीख 1 जानेवारी 2009 ते 1 जानेवारी 2013 या दरम्यान असावी व ऊंची 158 सेंमीच्या वर असावी. तसेच 16 वर्षाखालील खेळाडूंची जन्मतारीख 1 जानेवारी 2006 ते 1 जानेवारी 2008 यादरम्यान असावी व उंची 165 सेंमी च्या वर असावी.

सदर निवड चाचणीत खेळाडूंची उंची, शारीरिक क्षमता, कौशल्य चाचणी व खेळातील कामगिरी असे निवड चाचणीचे निकष करण्यात येणार आहे. निवड चाचणीस येताना खेळाडूंनी जन्मतारखेचा दाखला सोबत आणणे आवश्यक आहे. निवड चाचणी ठिकाणी फक्त खेळाडूंची निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवास व भोजन खर्च खेळाडूंनी स्वखर्चाने करावा. तरी, चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.