सामाजिक न्याय विभागाच्या अभ्यासिकेसाठी 10 जुलै रोजी चाळणी परीक्षेचे आयोजन

सामाजिक न्याय विभागाच्या अभ्यासिकेसाठी 10 जुलै रोजी चाळणी परीक्षेचे आयोजन

भंडारा, दि. 22 : जिल्हा नियोजन समितीच्या नाविण्यपूर्ण योजनेतून 26 जून 2016 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, जि. प. चौक, भंडारा येथे “डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र” 100 विद्यार्थी संख्येकरीता सुरु करण्यात आलेले आहे. अभ्यासिका केंद्रामध्ये UPSC/MPSC/Banking व इतर तद्नुषंगीक स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असणाऱ्या कोणत्याही पदवी शाखेतील 50 टक्के पेक्षा जास्त गुण/इयत्ता 12 वी मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांकरीता सत्र 2022-23 करीता नवीन सत्राची सुरुवात करण्यात येत आहे. सदर निवड ही गुणवत्तेनुसार करण्यात येणार आहे. अभ्यासिका केंद्रात प्रत्येक विद्यार्थ्यांना अभ्यासाकरीता स्वतंत्र कंपार्टमेंटची व्यवस्था, दरमहा भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन, Test Series Paper Set, Magazine, News Paper, Wi-fi, अत्याधुनिक Projector, इंटरनेटसह संगणक कक्ष, RO Water Cooler व्दारा पिण्याचे पाण्याची सोय, इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत. अभ्यासिका केंद्रात प्रवेशाकरीता दि. 10 जुलै, 2022 (रविवार) रोजी सकाळी 11.00 वाजता चाळणी परिक्षेचे (Entrennce Exam) आयोजन करण्यात आलेले आहे. त्याकरीता http://drbrambedkarstudycenter.in या संकेतस्थळावर दि.23 जून, 2022 पासून दि. 5 जुलै, 2022 पर्यंत फॉर्म उपलब्ध आहे. दि. 6 जुलै, 2022 पासून लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र अभ्यासिका केंद्रामध्ये उपलब्ध होतील. संकेतस्थळावर फॉर्म सादर केल्यानंतर अभ्यासिकेतील कार्यालयात चाळणी परिक्षा शुल्क रु. 150/- (अक्षरी रुपये एकशे पन्नास फक्त) जमा केल्यानंतर त्याचे रितसर पोचपावतीसह लेखी परिक्षेचे प्रवेशपत्र देण्यात येतील.तरी, भंडारा जिल्ह्यातील UPSC/MPSC/Banking व इतर तद्नुषंगीक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेतील प्रवेशाकरीता जास्तीत जास्त संख्येने अर्ज सादर करावे, असे आवाहन सुकेशिनी तेलगोटे, सहायक आयुक्त, समाज कल्याण तथा सदस्य सचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्र, भंडारा यांनी केलेले आहे. तसेच सदर चाळणी परिक्षेसंबंधी सर्व अधिकार समितीने राखून ठेवले असल्याचे सहायक आयुक्त समाज कल्याण श्रीमती सुकेशीनी तेलगोटे यांनी कळविले आहे.