राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे

शालेय शिक्षण विभागाच्या वतीने ‘#ज्ञानगंगा’ ह्या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत राज्यातील इ.१ ली ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी डी. डी. सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून १४ जून २०२१ पासून शैक्षणिक तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.कोरोनामुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

● सोमवार ते शुक्रवार

● वेळ – सकाळी ७.३० ते दुपारी ३.३० वा.

या कालावधीत वाहिनीवरील काही नियोजित बातम्यांची वेळ वगळता *दर दिवशी ५ तास* इयत्तानिहाय तासिकांचे प्रक्षेपण केले जाणार आहे.

● सदर कार्यक्रमाचे वेळापत्रक https://t.co/7bvguKy0S3 या संकेतस्थळावर पाहता येईल.

शैक्षणिक कार्यक्रमाचे दैनिक वेळापत्रक पाहण्यासाठी परिपत्रकात दिलेला QR कोड स्कॅन करा अथवा त्याठिकाणी क्लिक करून संकेतस्थळावरील वेळापत्रक पाहता येईल.

खलील क्रमांकावर डी. डी. सह्याद्री वाहिनी प्रक्षेपित होत असून विद्यार्थ्यांना याठिकाणी शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाहता येईल.

• DD Free Dish – 525
• Dish TV – 1229
• Videocon D2H – 769
• Tata Sky – 1274
• Hathway – 513