रब्बी हंगामातील धान व भरडधान्य खरेदीची नोंदणी 30 एप्रिलपर्यंत करा

रब्बी हंगामातील धान व भरडधान्य खरेदीची

नोंदणी 30 एप्रिलपर्यंत करा

चंद्रपूर,दि. 12 एप्रिल: पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान व भरडधान्य खरेदी करण्याकरीता  शासन निर्णयातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांची एन.ई.एम.एल पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्याअनुषंगाने दि. 11 एप्रिल ते 30 एप्रिल 2022 या कालावधीत नोंदणी करण्यात येणार आहे.

राज्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम 2021-22 (रब्बी) मधील धान खरेदीसाठी दि. 01 मे ते दि. 30 जून, 2022 असा कालावधी  ठेवण्यात आला आहे. तसेच भरडधान्य खरेदीकरीता स्वतंत्र सूचना काढण्यात येणार आहेत. शासन निर्णयानुसार सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून दिलेल्या कालावधी अखेर पणन हंगाम 2021-22 (रब्बी) धान व भरडधान्य खरेदी नोंदणीकरीता शेतकऱ्यांनी आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा 7/12, बँक खाते पासबुक इत्यादी संपूर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे