जिल्हाधिका-यांनी केली रामाळा तलाव खोलीकरणाच्या कामाची पाहणी

जिल्हाधिका-यांनी केली रामाळा तलाव खोलीकरणाच्या कामाची पाहणी

चंद्रपूर दि. 10 मार्च : शहरातील रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण व खोलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून या कामाची पाहणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केली.  यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरसा.बा.अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा नियोजन अधिकारी गजानन वायाळकार्यकारी अभियंता पाठबंधारे श्याम काळेरेल्वेचे अधिकरी श्री. मूर्तीपुरातत्व विभागाचे श्री. अख्तरमनपाचे अभियंता श्री. बोरीकरइको-प्रो चे बंडू धोत्रे व नोडल अधिकारी विक्रांत जोशी उपस्थीत होते.

पंधरवाडापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई येथे वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे रामाळा तलाव खोलीकरण व सौंदर्यीकरणसंदर्भात बैठक आयोजित केली होती. यावेळी तलावाच्या खोलिकरणाचे काम त्वरीत सुरू करावे, अशा सुचन मंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सुरू झालेल्या कामाची पाहणी करण्याकरीता जिल्हाधिका-यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट दिली.महानगर पालिकेने  एसटीपी व रेटनिंग वॉल बांधकामाची व सार्वजनिक बांधकाम विभागाने फूट ओव्हर ब्रिज कामाची तात्काळ सुरवात करावी. यासाठी पुरातत्व विभागाची परवानगी घ्यावी. तसेच पुरातत्व विभागाने त्यांची कामे ही जूनअखेर पर्यंत पूर्ण करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.