मोदी@९ जनसंपर्क अभियान हंसराज अहीर चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजकपदी

मोदी@९ जनसंपर्क अभियान हंसराज अहीर चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे संयोजकपदी

चंद्रपूर / यवतमाळ / गडचिरोली :- भारतीय जनता पार्टी द्वारा मिशन २०२४ अंतर्गत मोदी@९ जनसंपर्क अभियान दि. ३० मे २०२३ पासून राज्यभरातील सर्व लोकसभा मतदार क्षेत्रात सुरु करण्यात येत असून चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे अभियान संयोजक म्हणून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने नियुक्ती केली आहे.

प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण होत असल्याने सरकारची उपलब्धी गोरगरीब सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेले कार्य, विविध महत्वाकांक्षी योजना, शेतकरी कामगार, युवक, महिलांसाठीच्या विविध योजनांची उपलब्धी, मोदी सरकारचे राष्ट्रोन्नतीचे कार्य या सर्व उपलब्ध्या घेवून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या जनसंपर्क अभियानातून केला जाईल असे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे. महिनाभराच्या या महासंपर्क अभियानाअंतर्गत लोकसभा क्षेत्रातील सर्व विधानसभा क्षेत्रात पत्रकार परिषदा, विशाल रॅली, सोशल मिडीया बैठका, व्यापारी सम्मेलने, विविध क्षेत्रातील प्रबुध्द नागरीकांचे सम्मेलन व अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे.

मोदी@९ जनसंपर्क अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या ९ वर्षातील समाजाभिमुख लोकाभिमुख, विकासाभिमुख व राष्ट्राभिमुख योजनांची उपलब्धी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. मिशन २०२४ लोकसभा तसेच अन्य निवडणुकात भाजपाला देदिप्यमान यश संपादन करण्यासाठी सर्वांनी या जनसंपर्क महाअभियानात सहभागी व्हावे असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले आहे.