जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील नागरिकांचे पहिल्या डोसचे शंभर टक्के लसीकरण

जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील नागरिकांचे पहिल्या डोसचे शंभर टक्के लसीकरण

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

भंडारा, दि. 13 : जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील नागरिकांच्या वयोगटातील पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. जिल्ह्यामध्ये 8 लाख 97 हजार 210 लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस 83 टक्के नागरिकांनी घेतला आहे.

जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला चांगले यश मिळाले असून 24 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यामध्ये मिशन लेफ्ट  आउट म्हणून विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. त्यात 94 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. प्रशासनातील सर्व यंत्रणा गावागावापर्यंत लसीकरणासाठी पोहोचल्या होत्या.

जिल्ह्यात 77 रूग्ण पॉझिटिव्ह असून 333 सक्रिय रुग्ण आहेत. तिसऱ्या कोरोना लाटेला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणावर बाधित संख्या वाढत आहे. जिल्ह्यामध्ये सध्या फ्रन्टलाइन वर्कर व ज्येष्ठ नागरिकांना तिसरी वर्धक मात्रा देण्यात येत आहे. जिल्ह्यात 4000 हून अधिक नागरिकांना तिसरा म्हणजे बुस्टरडोस देण्यात आला आहे.