“जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम ” 27 ला उपवनसंरक्षक भलावी यांचे व्याख्यान

“जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम “

27 ला उपवनसंरक्षक भलावी यांचे व्याख्यान

भंडारा,दि.25:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्याने रविद्र ठाकरे, अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर, यांचे मार्गदर्शनाखाली 52 आठवडे दर सोमवारी ई-व्याख्यानमाला “जागतिक आदिवासी अस्मिता स्मरण कार्यक्रम” आयोजन करण्यात आले आहे.
आदिवासी समाजातील विद्यार्थांमध्ये वैद्याकीय, अभियांत्रीकी, याशिवाय इतर व्यवसायिक शिक्षणाबद्दल आवड, जिज्ञासा तसेच नवचैत्यन्य निर्माण व्हावे या दृष्टीकोणातून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सदर कार्यक्रमात प्रमुख वक्ते भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक एस. बी. भलावी व नागपूरचे से.नि. विभागीय वन अधिकारी, डी. एच. राऊत, यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. सदरचे व्याख्यान Youtube च्या माध्यमातून दिनांक 27 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजता https://youtu.be/FupPHEUo-jg या लिंकद्वारे थेट प्रक्षेपण होणार आहे, तरी सदर व्याख्यानाचा आदिवासी बांधवांनी, विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याबाबत तसेच दर सोमवारी प्रक्षेपीत होणाऱ्या व्हिडीओ ची Notification frostqualchetat https://www.youtube.com/channel/UCAD2Th178a7-rB58-Jejsca या लिंकद्वारे Nagpur ATC या Channel ला Subscribe चे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नीरज मोरे यांनी केले आहे.