मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी काव्यलेखन स्पर्धा

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी काव्यलेखन स्पर्धा

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

भंडारा, दि. 13 : महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठीचा दरवर्षी 14 जानेवारी ते 28 जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याअनुषंगाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा या कार्यालयामार्फत 14 ते 26 जानेवारी 2022 या कालावधीत ऑनलाईन ‘स्वरचीत मराठी काव्य लेखन स्पर्धा’ आयोजीत करण्यात आली आहे. सर्व काव्य प्रेमींना याद्वारे आवाहन करण्यात येते की, आपले स्वरचीत मराठी काव्य https://forms.gle/vpRe8gAGLoqXUicy8 या गुगल फॉर्म द्वारे पीडीएफ स्वरुपात सादर करावे. प्रथम तीन उत्कृष्ट कवितांना आकर्षक पारितोषिक दिले जाईल. तसेच सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. निवडक उकृष्ट कवितांचा प्रकाशनासाठी प्रयत्न केला जाईल.

स्पर्धेचे नियम व अटी : वयोगट – खुला गट (Open to all ), कविता स्वरचित असावी. कवितेचे शीर्षक ठळक अक्षरात असावे. स्पर्धेचा कालावधी  १४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२२ राहील. कविता सुवाच्य अक्षरात लिहून त्यांची स्कॅन केलेली pdf फाईल अपलोड करावी. एका कवी किंवा कवयीत्रींने एकच स्वलीखीत मराठी कवीता पाठवावी. अनुवादीत कवीता ग्राह्य धरण्यात येणार नाही. स्पर्धेच्या नियमात व आयोजनात काही बदल झाल्यास ते कळविण्यात येईल. स्पर्धेचा निकाल 28 जानेवारी कळविण्यात येईल. निकालाबाबत परिक्षकांचा व आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.

 पारितोषिक :  प्रथम तीन उत्कृष्ट कवितांना आकर्षक पारितोषिक दिले जाईल. सहभागी कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. निवडक उकृष्ट कवितांचा प्रकाशनासाठी प्रयत्न केला जाईल. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा येथील दुरध्वनी क्रमांक 07184-252250 येथे संपर्क साधावा. नवोदित कवींनी अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा यांनी केले आहे.