पोलीस मुख्यालयातील लसीकरण केंद्रावर 552 लाभार्थ्यांना बुस्टर डोस

पोलीस मुख्यालयातील लसीकरण केंद्रावर 552 लाभार्थ्यांना बुस्टर डोस

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

भंडारा दि. 11 : शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 60 वर्षे व त्यावरील नागरिकांना बुस्टर डोस देण्यात येत आहे. आज पोलीस मुख्यालय भंडारा येथे पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अति. पो. अधीक्षक अनिकेत भारती यांचे मार्गदर्शनात ड्रिल शेड येथे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता बुस्टर डोस चे आयोजन केले होते.

या बुस्टर डोस कॅम्प मधे पोलीस, होमगार्ड, जिल्हाधिकारी कार्यालय स्टाफ, जेष्ठ नागरिक असे एकूण 535 जणांना बुस्टर डोस देण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रतिबंधक उपाय म्हणून कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात  494  पोलीस अधिकारी / अंमलदार, 42 जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपीक व 16 सैनिक ह्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला.