महारेशीम अभियानाला जिल्हयात सुरुवात रेशीम प्रचार रथाचे उदघाटन

महारेशीम अभियानाला जिल्हयात सुरुवात रेशीम प्रचार रथाचे उदघाटन

      भंडारा, दि. 22 :शेतक-यांना रेशीम शेतीकडे वळविण्यासाठी जिल्हयात रेशीम उद्योगाचा प्रचार – प्रसारासाठी जिल्हयात रेशीम प्रचार रथ फिरणार आहे.या रेशीम प्रचार रथाला अति.जिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून  शुभारंभ् करण्यात आला.या प्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी  प्रशांत पिसाळ व जिल्हा नियोजन अधिकारी  शशीकुमार बोरकर उपस्थित होते. रेशीम विकास अधिकारी माधव डिगुळे वरिष्ठ तांत्रिक सहायक अनिलकुमार ढोले, वरिष्ठ क्षेत्र सहायक, श्री .बिजवे लिपिक श्री .ढोणे,श्री. लोहारे व सेवानिवृत्त कर्मचारी हजर होते.

        शासनाने 20.11.23 ते 20.12.24 या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यास मान्यता दिली आहे.याची सुरवात आज दि 21.11.23रोजी जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे महारेशीम अभियान कालावधीत सन2024-25 मध्ये तुती रेशीम व टसर रेशीम उद्योग करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. मनरेगा अंतर्गत तुती रेशीम कार्यक्रम हा रेशीम विभागासोबतच कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग मार्फत राबविण्यात येणार आहे

        तरी इच्छुक शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय ,मदन निवास राजीव गांधी चौक, येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा रेशीम कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे.