ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचे जात पडताळणी संबंधी प्रकरणे निकाली काढण्यासाठी 12 जानेवारीला विशेष मोहीम

ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांचे जात पडताळणी संबंधी प्रकरणे निकाली काढण्यासाठी 12 जानेवारीला विशेष मोहीम

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

भंडारा दि. 7 : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 मध्ये राखीव मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने स्विकारण्यात आले होते. आरक्षित जागेवर निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रकरणांची समितीने तपासणी केली असता त्यातील काही प्रकरणांमध्ये समितीने त्रुटी नोंदविल्या आहेत. अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याकरिता निवडणूक आयोगाने दिलेला विहित कालावधी लवकरच संपत असून अर्जदारांनी त्यांच्या प्रकरणामध्ये त्रुटींची पुर्तता केलेली नाही. त्यामुळे त्रुटींची पुर्तता करणेबाबत समितीसमक्ष 12 जानेवारी 2022 ला उपस्थित राहून जात आणि अधिवासाचे मानीव दिनांकापुर्वीचे पुरावे सादर करण्याबाबत उपायुक्त जिल्हा जात पडताळणी समिती भंडारा यांनी कळविले आहे.