चंद्रपुरातील शाळा- महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार मनपा मुख्यालयात प्राचार्य- मुख्याध्यापकांची बैठक

चंद्रपुरातील शाळा- महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार

मनपा मुख्यालयात प्राचार्य- मुख्याध्यापकांची बैठक

 
मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर : शहरातील १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण सुरु झाले असून, लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी महापालिकेने शाळा- महाविद्यालयात केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात मनपा मुख्यालयाततील राणी हिराई सभागृहात गुरुवारी (ता. ६) प्राचार्य- मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली. यावेळी उपायुक्त अशोक गराटे यांनी मार्गदर्शन केले.

दहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांचे वय १५ ते १८ आहे. त्यामुळे महापालिकेने शैक्षणिक संस्थांनाही लसीकरण शिबिरासाठी विनंती केली. महापालिकेच्या विनंतीवरून शाळा, महाविद्यालयाचे प्राचार्य- मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्यासाठी सहकार्य करू, असे सांगितले. त्यानुसार शाळाची यादी तयार करून लसीकरणाचे वेळापत्रक लवकरच तयार करण्यात येणार आहे. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर येताना स्वत:चे आधार कार्ड आणि मोबाईल आवश्यक आहे. १५ ते १८ वर्ष वयोगटातील मुले आणि मुलींच्या  शाळा- महाविद्यालयातील लसीकरण मोहिमेला लवकरच प्रारंभ होईल, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. अतुल चटकी यांची उपस्थिती होती