‘त्या’ रुग्णवाहिका अधिकृत डीलर्सकडे सर्विसिंग व दुरुस्तीकरीता उभ्या

त्या रुग्णवाहिका अधिकृत डीलर्सकडे सर्विसिंग व दुरुस्तीकरीता उभ्या

मिथुन मेश्राम सिन्देवाही – 9923155166

चंद्रपूर, दि. 6 जानेवारी : चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या रुग्णवाहिका धूळखात नसून त्या अधिकृत डिलर्सकडे सर्विसिंग, दुरुस्तीकरीता आल्या होत्या. फोर्स डीलर्स, शक्ती इंजिनिअरिंग, पडोली येथे आलेल्या रुग्णवाहिका ह्या चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या रुग्णवाहिका आहेत.

त्या रुग्णवाहिकांमध्ये जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, चंद्रपूरच्या एकूण चार रुग्णवाहिका सर्विसिंग व दुरुस्तीसाठी उभ्या आहेत, असे जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय, चंद्रपूर यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.