पोंभुर्णा तालुक्‍यातील नरभक्षक वाघाला त्‍वरित जेरबंद करावे- आ. सुधीर मुनगंटीवार

पोंभुर्णा तालुक्‍यातील नरभक्षक वाघाला त्‍वरित जेरबंद करावे- आ. सुधीर मुनगंटीवार

पोंभुर्णा तालुक्‍यात धुमाकुळ घालणा-या नरभक्षक वाघाला वनविभागाने तातडीने जेरबंद करावे अन्‍यथा भारतीय जनता पार्टी तिव्र जनआंदोलन छेडेल असा इशारा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर वनवृत्‍ताचे मुख्‍य वनसंरक्षक व सर्व सबंधीतांना सुचना दिल्‍या आहेत. पोंभुर्णा तालुक्‍यातील कसरगट्टा, गंगापूर, बोर्डा बोरकर, घनोटी या गावांमध्‍ये गेल्‍या ८ दिवसापासून नरभक्षक वाघाचा धुमाकुळ सुरु आहे. या वाघाच्‍या हल्‍ल्‍यात आतापर्यंत ८ व्‍यक्‍ती जखमी झाले असुन दोन व्‍यक्‍ती मृत झाले आहेत. यामुळे पोंभुर्णा तालुक्‍यातील नागरिकांमध्‍ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकरी जीव मुठीत घेवुन जगत आहेत. सदर नरभक्षक वाघाला तातडीने जेरबंद करणे आवश्‍यक आहे. वनविभागाचे याकडे अक्षम्‍य दुर्लक्ष होत आहे. सदर वाघाला तातडीने जेरबंद करत नागरिकांना दिलासा देण्‍याची मागणी मा. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.