सुनील गेडाम यांच्या न्यायोचित मागण्याच्या उपोषणाला पुरोगामी पत्रकार संघ,सिंदेवाहीचा जाहीर पाठिंबा

सुनील गेडाम यांच्या न्यायोचित मागण्याच्या उपोषणाला पुरोगामी पत्रकार संघ,सिंदेवाहीचा जाहीर पाठिंबा
-: मुख्य मागणी :-
१.सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी साझा क्र १५ मधील गट नंबर४८९/४ या शेतीचा फेरफार न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात यावा. २)सिंदेवाही तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या कार्यकाळातील महसूल प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात यावी. ३)सिंदेवाही चे तहसीलदार गणेश जगदाळे यांच्या कार्यकाळात तालुक्यातील अवैध रेती उत्खननाची विभागीय चौकशी करण्यात यावी.

सिंदेवाही-तालुक्यातील लाडबोरी येथील रहिवासी, पत्रकार सुनील विठ्ठल गेडाम हे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आप घेऊन उपोषणाला बसले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तहसील कार्यालयात सर्व सामान्य माणसाची गळचेपी होते. पैशाच्या जोरावर अशक्य कामे शक्य होतात. सामान्य माणसांचे शक्य काम अशक्य होतात. हे प्रत्यक्षात उपोषण कर्ता सुनील गेडाम त्यांच्या शेतीच्या फेरफार प्रकरणावरून स्पष्ट अनुभवायला मिळते आहे. मागील आठ महिन्यापासून ते आजपर्यंत शेतीच्या फेरफार संबंधित कामाकरिता वारंवार तहसील कार्यालय, एसडीओ कार्यालया पर्यंत चक्करा माराव्या लागल्यात. त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील एक जीवनावश्यक वस्तू कमी खरेदी करून ते पैसे त्यांनी त्यांच्या या कार्यालयाच्या फेरफटका मारण्यात खर्ची घातले. मात्र अधिकारी वर्ग त्यांना तुमची शेतजमीन ही शासन जमा करू असे धमकवायचे. तसेच त्यांचे कागदोपत्री व्यवहारात तहसीलदाराने स्वतःच्या कर्तव्यात कसूर केल्याचे निष्पन्न झाले. अखेर त्यांचा फेरफार हा प्रलंबित असल्याने त्यांनी पुरोगामी पत्रकार संघ सिंदेवाहीकडे त्यांनी आपल्यावर झालेला अन्याय कथन केला. त्यांच्यावर झालेला हा अन्याय ऐकताच पुरोगामी पत्रकार संघ सिंदेवाहीचे पत्रकार बंधूनी न्याय मिळेपर्यंत खंबीर भूमिका घ्यावी असे सांगितले. व त्यांनी प्रशासनाच्या परिस्थितीला कंटाळून बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग निवडला.तुम्ही जरी एकटे दिसत असलात तरी तुम्ही एकटे समजू नका पुरोगामी पत्रकार संघ तुमच्या सोबतीला आहे.असे पत्रकार बंधूनी सांगितले तसेच त्यांनी निवडलेल्या मार्गाला पुरोगामी पत्रकार संघ, सिंदेवाही तर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.