शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकांच्या ई-पिक पाहणी नोंदविण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी आपल्या शेतपिकांच्या ई-पिक पाहणी नोंदविण्याचे आवाहन

गडचिरोली, दि.24: गडचिरोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी चालु खरीप हंगामात अजुनही पीक पाहणी नोंदवली नाही अशा शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात. तेव्हा शेतकऱ्यांनी तात्काल ई-पीक पाहणी ॲपद्वारे पीक पाहणी नोंदवावी असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.
पीक पाहणी मोबाईल वरुन करण्याची सुविधा शासनाने दिलेली आहे. ई-पीक पाहणीसाठी नवीन सुविधायुक्त सोपे आणि सुलभ ॲप तयार करण्यात आले आहे. तरी अद्याप पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी मोबाईलवरुन आपल्या शेतातील पिकांची नोंदणी केली नाही अशा शेतकऱ्यांनी प्ले स्टोअरवर जाऊन ई-पीक पाहणी व्हर्जन 2 हे ॲप डाऊनलोड करुन तात्काळ ई-पीक पाहणी करण्यात यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली सुनिल सुर्यवंशी यांनी कळविले आहे.