कृषि बाजार समितीतील हमाल, फळ विक्रेत्यांची आरोग्य तपासणी     ८२ जणांनी घेतली कोरोनाची प्रतिबंधक लस

कृषि बाजार समितीतील हमाल, फळ विक्रेत्यांची आरोग्य तपासणी  

 ८२ जणांनी घेतली कोरोनाची प्रतिबंधक लस

चंद्रपूर, ता. २४ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मार्फतीने दाताळा रोड रामनगर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमधील हमाल, फळ विक्रेते, भाजीपुरवठादार यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र -२ च्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबीरात २७५ हून अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली. शिवाय ८२ जणांना कोरोनाची प्रतिबंधक लस देण्यात आली.

लसीकरण शिबीराचे उद्घाटन झोन-१ च्या सभापती छ्बुताई वैरागडे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिव श्री. पावडे आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत, डॉ. अतुल चटकी, डॉ. अश्विनी येडे यांची उपस्थिती होती. यावेळी फिजिशियन व त्वचारोगतज्ञ डॉ. भागवत आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. साने तसेच दंतरोग चिकित्सक डॉ. राठी यांनी तपासणी केली. आरोग्य तपासणी व कोविड लसीकरण शिबिराला उपमहापौर राहुल पावडे यांनी देखील भेट दिली.
कृषि बाजार समितीतील हमाल, फळ विक्रेते आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. शिवाय जनतेच्या सतत थेट संपर्कात असतात. त्यामुळे आरोग्य सुदृढ राहावे असावे, यासाठी मनपाच्या पुढाकारातून आरोग्य तपासणी करण्यात आली. येथे पुढील काही दिवस कोविड लसीकरण होणार आहे.