सावित्रीबाई फुले अभ्यासिका येथे  साहीत्य उपलब्ध करून देखरेखीसाठी कर्मचारी नेमण्यात यावे.

सावित्रीबाई फुले अभ्यासिका येथे  साहीत्य उपलब्ध करून पूर्णवेळ देखरेखीसाठी कर्मचारी नेमण्यात यावे.

विद्यार्थी व प्रभाग क्र. – 17 येथिल नागरीकांची मागणी

सावित्रीबाई फुले अभ्यासिका शिक्षक कॉलनी प्रभाग क्र. 17 सिंदेवाही सुरु होवून जवळपास एक वर्ष पूर्ण झाले, अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे शहरातील विद्यार्थी अभ्यासिकेत येत असून त्यांना खूर्ची, टेबल अपूरे पडत आहेत. अभ्यासिकेत पिण्याच्या पाण्याची सोय नसून शौचालयासाठी वापरायचे पाणी सुध्दा उपलब्ध नाही आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यास्तव विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी या सर्व सुविधा उपलब्ध करून यांवर देखरेखीसाठी पूर्णवेळ कर्मचारी नेमण्यात यावा अशी मागणी नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही चे मुख्याधिकारी यांचेकडे मागणी केली आहे.