मनपातर्फे सरकारनगर येथे मतदार नोंदणी व दुरूस्ती संदर्भात विशेष वार्डसभेचे आयोजन 

मनपातर्फे सरकारनगर येथे मतदार नोंदणी व दुरूस्ती संदर्भात विशेष वार्डसभेचे आयोजन 

चंद्रपूर, ता. २४ : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२२ अंतर्गत दिनांक १ ते ३० नोव्हेंबर २०२१ दरम्यान मतदार नोंदणी जनजागृती अभियान राबविले जात आहे. त्या अनुषंगाने चंद्रपूर शहर महानगरपालिकेद्वारे आयोजित मतदान केंद्र क्र. ५४ ते ८० यांची विशेष वार्डसभा बुधवार, दि. २४/११/२०२१ रोजी कर्मवीर कन्नमवार प्राथमिक मनपा शाळा, सरकारनगर येथे दुपारी १२ वाजता पार पडली.

वॉर्डसभेला उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी सभेत आलेल्या दिनांक १/१/२०२२ रोजी या अहर्ता दिनांकावर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांची नावे, लग्न होऊन गावात आलेल्या महिला, लग्न होऊन गावातून गेलेल्या महिला, मृत व्यक्ती, अपंग व्यक्ती यांची यादी तयार करून फॉर्म नं ६, ७, ८, ८अ, नव्याने भरण्याची कार्यवाही केली. तसेच नागरिकांना ऑनलाईन मतदार नोंदणी हेल्पलाईन ॲपवर नाव कसे नोंदवावे याबद्दल दिली. याशिवाय संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी वॉर्डसभेमध्ये शहरातील नागरिकांना दिलेल्या हरकती आणि आक्षेप, नाव नोंदणी दुरुस्ती अर्जाच्या स्थितीबाबत त्या नागरिकांना कुठून व कशी माहिती मिळेल, याबाबत मार्गदर्शन देखील केले. 
यावेळी स्थायी समिती सभापती संदीप आवारी, माजी महापौर अंजलीताई घोटेकर, महिला व बालकल्याण सभापती पुष्पाताई उराडे, नगरसेविका शीतल गुरनुले, नगरसेविका वनिताताई डुकरे, नगरसेवक सोपान वायकर, माजी नगरसेवक विठ्ठलराव डुकरे, श्रीमती मालोदे, श्री. नवले यांची उपस्थिती होती.
 
मनपा अधिकारी, नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी अधिकाधिक नवमतदार व नागरिकांनी मतदार यादीत नाव नोंदवून लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन याप्रसंगी नागरिकांना केले.