भंडारा : मोहाडी पंचायत समिती आरक्षण अधिसूचना प्रसिध्द

मोहाडी पंचायत समिती आरक्षण अधिसूचना प्रसिध्द

भंडारा, दि.23 : जिल्हा परिषद अंतर्गत मोहाडी पंचायत समिती निर्वाचक गणाची व्याप्ती व अंतिम सुधारित आरक्षणाची अधिसूचना जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी काल (दि.22) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार मोहाडी तालुक्यातील निर्वाचक गण क्रमांक व आरक्षणाची सोडत खालीलप्रमाणे आहे.

21- कांद्री निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती कांद्री, हिवरा, बच्छेरा, बोंद्री, आणि देऊळगाव (सर्वसाधारण महिलांसाठी), 22- जांब निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती जांब, खैरलांजी, धुसाळा, नवेगाव धु., काटी, सकरला, शिवणी (सर्वसाधारण महिलांसाठी), 23- उर्सरा निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती उर्सरा, टाकला, धोप, ताडगाव, सालई खु., काटेबाम्हणी, टांगा (सर्वसाधारण), 24- डोंगरगाव निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती डोंगरगाव, भीकारखेडा, विहीरगाव, सालई बु., कुशारी, महालगाव (सर्वसाधारण),  25- आंधळगाव निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती आंधळगाव, अकोला, ‍चिचोली, मलीदा, पिंपळगाव का., पालडोंगरी (सर्वसाधारण महिला), 26- हरदोली निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती हरदोली, ‍ सितेपार झं., पांढराबोडी, सालेबर्डी, कान्हळगाव सि., सिरसोली, वडेगाव, चिचखेडा, (सर्वसाधारणसाठी) 27- खमारी बुज निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती खमारी बुज,‍ पिंपळगाव झं, खुटसावरी, मांडेसर, पारडी, (सर्वसाधारणसाठी), 28- पाचगांव निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती पाचगांव, नेरी, सातोना, पाहुणी, भोसा, बिड/सितेपार (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), 29- वरठी निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती वरठी वार्ड क्र.1, 3, 4, 5, 6 (सर्वसाधारण), 30- मोहगाव देवी निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती ‍मोहगाव देवी, दहेगाव, बोथली, एकलारी, वरठी वार्ड क्र.2 (नागरिकांचा मागास प्रवर्ग), 31-बेटाळा निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती बेटाळा, मुंढरी बुज, रोहणा, रोहा  (सर्वसाधारणसाठी), 32- पालोरा निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती पालोरा, पांजरा बो, खडकी‍, ढिवरवाडा, कन्हाळगांव क., बोरगाव (नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला), 33 देव्हाडा खु. निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती देव्हाडा खुर्द, देव्हाडा बुज., निलज बुज,‍ निलज खुर्द, मोहगाव बुज, नवेगांव बुज, (अनुसूचित जमाती महिला), 34- करडी निर्वाचक गणासाठी प्रदेशाची व्याप्ती करडी, मुंढरी खुर्द, जांभोरा, केसलवाडा (अनुसूचीत जाती महिला) ही अधिसूचना जिल्हाधिकारी कार्यालयाचे नोटीस बोर्ड, मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा यांच्या कार्यालयीन नोटीस बोर्डवर तसेच सर्व तहसील व सर्व पंचायत ‍ समित्यांच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे.