पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 18 नोव्हेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 19 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता एन.डी. हॉटेल, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता एन.डी. हॉटेल, चंद्रपूर येथे डॉक्टर, वकील, उद्योजक यांच्यासमवेत आयोजित बैठकीस उपस्थित. सकाळी 10.40 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील  वीस कलमी सभागृहात आयोजित अनुकंपा तत्वावरील उमेदवार, धारक यांच्या समस्यांबाबत संबधित अधिकाऱ्यांसमवेत  बैठक. दुपारी 12 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे महाज्योती नागपुरमार्फत ऑनलाइन प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व डेटा सिम वाटप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 ते 2.30 वाजेपर्यंतचा वेळ राखीव. सायंकाळी 5 वाजता पिपरी (धानोरा) जि. चंद्रपूर येथे आगमन व पक्षाच्यावतीने आयोजित जनजागरण अभियान कार्यक्रमास उपस्थित.

शनिवार, दि. 20 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 8 वाजता पिपरी (धानोरा) येथे पक्षाच्यावतीने आयोजित जनजागरण अभियान कार्यक्रमांतर्गत जनजागरण प्रभात फेरीस उपस्थित. सकाळी 11 वाजता पिपरी (धानोरा) येथून सावलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता सावली येथे आगमन व सावली तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीची व भागाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी. दुपारी 12.45 वाजता चेकपिरंजी ता. सावली येथे आगमन व श्री. वाडगोरे यांच्याकडे सांत्वनपर भेट. सायंकाळी 6 वाजता सावली येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

रविवार, दि.21 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन व राखीव. दुपारी 12 वाजता प्रभात पॉलीटेक्निक कॉलेज, खरकाडा फाटा, ब्रह्मपुरी येथे पक्षाच्यावतीने आयोजित पक्ष सदस्य नोंदणी शुभारंभ व जनजागरण अभियानांतर्गत मेळाव्यास उपस्थित. दुपारी 3 ते 3.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे राखीव. सायंकाळी 5 वाजता ब्रह्मपुरी महोत्सवाच्या पूर्वतयारी निमित्ताने पदाधिकारी व संबंधितांसोबत चर्चा. सायंकाळी 7 वाजता ब्रह्मपुरी येथून नागपूरकडे प्रयाण.

मंगळवार दि.23 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11.45 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे खनिज विकास प्रतिष्ठान व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांच्यासोबत चर्चा. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पिकविमा संदर्भात पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक. दुपारी 1 वाजता खनिज विकास प्रतिष्ठानच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 1.45 वाजता वेळ राखीव. दुपारी 2 वाजता नियोजन भवन, चंद्रपूर येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5.30 वाजता नियोजन भवन येथे पत्रकार परिषद. सायंकाळी 6 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.