भंडारा : 23 व 24 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

23 व 24 नोव्हेंबर रोजी

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

भंडारा, दि. 18 : हरियाणा येथील चौथ्या खेलो इंडिया यूथ गेम्स मध्ये सहभागी होण्यास इच्छुक युवक-युवतींसाठी जिल्हास्तरीय खेळ स्पर्धेचे आयोजन 23 व 24 नोव्हेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे करण्यात आले आहे. हरियाणा येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये 18 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी सहभागी खेळाडूंची जन्मतारीख 1 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरची असावी. खो-खो, कबड्डी व बास्केटबॉल यातील खेळ प्रकारांचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल भंडारा येथे करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, क्लब व शाळाबाह्य खेळाडूंना निवड चाचणीसाठी संधी देण्यात येईल. सहभागी होण्याच्या दृष्टीने 22 नोव्हेंबर रोजी कार्यालयीन वेळेत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.