भंडारा : महाबीजव्दारे सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविणार 22 नोव्हेंबरपर्यत शेतकऱ्यांनी आरक्षण निश्चीत करावे  – व्यवस्थापक महाबीज

महाबीजव्दारे सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविणार

22 नोव्हेंबरपर्यत शेतकऱ्यांनी आरक्षण निश्चीत करावे  – व्यवस्थापक महाबीज

भंडारा, दि. 18:  अतिवृष्टीमुळे राज्यातील सोयाबीन बिजोत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. याच दृष्टीने कृषी विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात भंडारा, पवनी, लाखांदुर तालुक्यात सोयाबीन पिकाची लागवड करण्याऱ्या शेतकऱ्यांकडे सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. नुकतीच जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी याबाबत बैठक घेतली.

शासन निर्देशानुसार महाबीज व्दारे जिल्ह्यात रब्बी/उन्हाळी 2021-2022 हंगामात 100 हेक्टर क्षेत्राचा त्रृटीपुर्ती सोयाबीन जेएस-9305 वाणाचा बिजोत्पादन कार्यक्रम तालुका कृषी अधिकाऱ्यांनी राबवावा, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले.

बिजोत्पादनाचे आयोजन करतांना एका गावात कमीत कमी 13 एकर क्षेत्राचे आयोजन होणे आवश्यक आहे. लागणारे स्त्रोत बियाणे महाबीजकडून पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक शुल्क बियाणे उचल करतांना भरावयाचे आहे. सोयाबीन बिजोत्पादनाचे आरक्षण सुरू झाले असून त्यासाठी शेतकऱ्यांनी 22 नोव्हेंबरपर्यत प्रति एकर 100 रूपयाप्रमाणे महाबीजकडे जमा करून बीजोत्पादनाचे आरक्षण निश्चित करून घेण्याचे आवाहन  जिल्हा व्यवस्थापक एन. पी. खांडेकर यांनी केले आहे.