अनुसूचित जमाती कल्याण समितीने घेतला विविध विषयांचा आढावा 

????????????????????????????????????

अनुसूचित जमाती कल्याण समितीने घेतला विविध विषयांचा आढावा 

भंडारा, दि. 30 : विधीमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने शुक्रवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी दौरा केल्यानंतर आज (दि.30) जिल्हा परिषद सभागृहात समिती प्रमुख आमदार दौलत दरोडा यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांचा आढावा घेतला.
यावेळी आमदार सर्वश्री डॉ. अशोक उईके, श्रीनिवास वनगा, अनिल पाटील, सहसराम कोरोटे, राजेश पाडवी, भीमराव केराम, राजकुमार पटेल, किरण सरनाईक, रमेश पाटील, समितीचे उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव मोहन काकड यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, पोलिस अधिक्षक कार्यालय, सर्व नगरपरिषद, नगरपंचायत, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय कार्यालय, ‍जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच विविध विभागांचा आढावा घेतला.