खासदार अशोक नेते यांच्या हस्ते खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत स्कूल बसचे लोकार्पण सोहळा संपन्न…

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत स्कूल बसचे लोकार्पण सोहळा संपन्न…

बहुजन हिताय शिक्षण संस्था कुरखेडा द्वारा संचालित आंवान विद्यालय तथा जुनीयर कॉलेज आंधळी (फाटा) ता. कुरखेडा जि. गडचिरोली यांच्या सौजन्याने वार्षिक स्नेहसंम्मेलन व पालक मेळावा दि.०४ व ०५ जानेवारी २०२४ रोजी आयोजीत करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी दि . ०५ जानेवारी २०२४ रोजी मा.खासदार अशोकजी नेते गडचिरोली चिमूर निर्वाचन क्षेत्र यांच्या खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत कार्यक्रम सन- २०२२-२३ शाळेला ३६ सिटर स्कूल बस प्राप्त झाली. स्कूल बस लोकार्पण सोहळा खासदार अशोक नेते यांच्या शुभहस्ते पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्धघाटक खासदार अशोकजी नेते, अध्यक्ष स्थानी संस्थेचे सचिव श्री. कृपालजी मेश्राम हे होते.
या उद्घाटन प्रसंगी मा. खासदार अशोकजी नेते यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थाना उध्दबोधण करीत असतांना आपल्या संस्थेमार्फत आदिवासी विद्यार्थ्याकरिता कुठलेही बसचे शुल्क न आकारता मोफत बस सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे सचिव श्री. कृपालजी मेश्राम व सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य व शिक्षक यांचे अभिनंदन केले व सर्व विद्यार्थ्याना नवीन वर्षाच्या व उज्ज्वल भविष्या करिता शुभेच्या दिल्या या प्रसंगी स्कूल बस करिता रुपये बावीस लक्ष पन्नास हजार रुपये खासदार निधीतून उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेमार्फत मा. खासदार अशोकजी नेते साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर सोनवाणे, प्राचार्य श्री. महेश खुने, श्री जणार्धन मस्के सर, श्री किशोर मेश्राम सर, सौ. चारुलता वालदे मॅडम , प्रा. राकेश राऊत, प्रा. राजेंद्र पिसे, श्री. प्रकाश हजारे, श्री. निखिल डोर्लीकर, श्री. तुषार फुले, श्री. शुभम लांजेवार, श्री. नरेंद्र कोसे, श्री. विलास भानारकर यांचे सहकार्य लाभले.