पॅन इंडिया महाशिबिरात अन्न व औषध प्रशासन विभागाचा नोंदणी कॅम्प

पॅन इंडिया महाशिबिरात अन्न व औषध

प्रशासन विभागाचा नोंदणी कॅम्प

भंडारा, दि. 22 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा तसेच अन्न व औषध प्रशासन यांचे कार्यालयामार्फत जे. एम. पटेल महाविद्यालय, भंडारा येथे 23 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता नोंदणी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
अन्न व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 अंतर्गत परवाना, नोंदणी प्रमाणपत्र घेवूनच अन्न व्यवसाय करणे गरजेचे आहे. ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल 12 लाखापेक्षा जास्त असल्यास अन्न परवाना घेणे आवश्यक आहे तर ज्या अन्न व्यावसायिकांची वार्षिक उलाढाल 12 लाखापेक्षा कमी असल्यास अन्न नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. अन्न परवाना तथा नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी foscos.fssai या संकेतस्थळावर अर्ज करावा. अन्न व्यावसायिक, भाजीपाला, फळ, पाणीपूरी, पावभाजी विक्रेते यांनी परवाना, नोंदणी करण्यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्डची झेरॉक्स, इलेक्ट्रीक बिल झेरॉक्स व नोंदणी शुल्क शंभर रुपये प्रती वर्ष याप्रमाणे कागदपत्रे घेवून उपस्थित राहावे व नोंदणी कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी बी. जी. नंदनवार यांनी केले आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा स्टॉल : ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज योजनांची माहिती देण्याकरिता स्टॉल लावण्यात येणार आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी सुहास बोंदरे यांचे मोबाईल क्रमांक 7588768424 वर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.