महिलांनी आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकाराचा योग्य वापर करावा – कविता बि.अग्रवाल
Ø आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भव्य विधी जनजागृती शिबिराचे आयोजन
चंद्रपूर दि. 14 ऑक्टोबर : महिलांनी समाजात वावरतांना आपल्या संरक्षणासाठी असलेले कायदे व अधिकारांचा योग्य वापर करावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता बि. अग्रवाल यांनी केले. आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा न्याय मंदिर सभागृहात आयोजित कायदेविषयक जनजागृती महिला मेळावा व पोषण आहार पाककृती प्रदर्शनी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा विभिन्न संघाचे अध्यक्ष ॲड अभय पाचपोर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधीक्षक सुशील खडसान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. जाधव, महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
राज्य महिला आयोग, केंद्रीय महिला आयोग, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती महिला मेळावा, आहार प्रदर्शनी व पथनाट्य उपक्रमाचे आयोजन जिल्हा न्यायालय येथे करण्यात आले.










