४७ मोकाट गायींची प्यार फाऊंडेशनच्या गोशाळेत रवानगी,मालकांवर होणार गुन्हे दाखल

४७ मोकाट गायींची प्यार फाऊंडेशनच्या गोशाळेत रवानगी,मालकांवर होणार गुन्हे दाखल

चंद्रपूर २ ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम जोमाने सुरु करण्यात आली असुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या ४७ गायींना / म्हशी पकडुन त्यांची रवानगी प्यार फाऊंडेशनची गोशाळा येथे करण्यात आली आहे.
मोकाट जनावरे शहरातील मुख्य तसेच इतर मार्गांवर, रस्त्यांवर ठाण मांडून बसून राहात असल्याने वाहनधारकांचा अपघात होण्याची शक्यता अधिक असते. याबाबत मनपातर्फे यापुर्वीही कारवाई करून जनावरांच्या मालकांना समज देण्यात आली आहे.समज दिल्यानंतर काही काळ ते आपल्या जनावरांवर लक्ष देऊन ते रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेतात,मात्र त्यानंतर पुन्हा जनावरांना मोकाट सोडुन देण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने मनपातर्फे कठोर कारवाई करण्याची सुरवात करण्यात आली आहे.
मागील महिन्यापासुन मनपाच्या पथकाने नागपूर रोड, राष्ट्रवादी नगर, तुकूम, बंगाली कॅम्प, बागला चौक, गांधी चौक बाजार,दाताला रोड रामसेतु इत्यादी परिसरात कारवाई करत मोकाट असलेली ४७ जनावरे पकडण्यात आली आहे. त्यांची रवानगी प्यार फाऊंडेशन येथे करण्यात आली सर्व मोकाट जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केली जाणार असल्याचे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.