सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना सूचना

सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना सूचना

                भंडारा,दि.13: सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना महालेखाकार, नागपूर यांचेकडून निवृत्तीवेतनासंबंधी आदेश प्राप्त झाल्यास निवृत्तीवेतन सुरू करण्याकरिता ओळख तपासणी बाबतचे पत्र कोषागार कार्यालय, भंडारा कडून प्राप्त करुन घ्यावे. यानंतर ओळख तपासणीकरिता पत्र पाठविण्यात येणार नाही. असे जिल्हा कोषागार अधिकारी रमेश कुमरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.