7 व 8 ऑक्टोबर रोजी खेलो इंडिया अतंर्गत ॲथलेटिक्स खेळाची निवड चाचणी

7 व 8 ऑक्टोबर रोजी खेलो इंडिया अतंर्गत ॲथलेटिक्स

खेळाची निवड चाचणी

चंद्रपूर दि. 4 ऑक्टोबर : केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयांतर्गत चंद्रपूर जिल्हयाकरीता खेलो इंडिया सेंटर अंतर्गत राजुरा येथे मैदानी क्रीडा स्पर्धा ॲथलेटिक्स या खेळ प्रकाराचे केंद्र मंजूर केले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने 14 व 16 वर्षाआतील खेळाडू मुले व मुलींची जिल्हास्तरीय निवड चाचणी  दि. 7 व 8 ऑक्टोबर 2021 या कालावधीत तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर (विसापूर)  येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर प्रशिक्षण केंद्रात अनिवासी खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
   चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी होण्याच्या दृष्टीने दि. 7 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.