धान व भरडाधान्य खरेदीसाठी नोंदणी करण्याकरीता 15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ Ø शेतकऱ्यांनी केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

धान व भरडाधान्य खरेदीसाठी नोंदणी करण्याकरीता

15 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

Ø शेतकऱ्यांनी केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 4 ऑक्टोबर : पणन हंगाम सन 2021-22 मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व भरडाधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता दि. 15 ऑक्टोबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार सदर हंगामामधील धान खरेदीची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर 2021 अखेर आपल्या नजीकच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी.  नोंदणी करण्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, वोटिंग कार्ड, शेतीचा सातबारा, बँक खाते पासबुक इत्यादी संपूर्ण माहितीसह खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल गोगीरवार यांनी केले आहे.