तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु

तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व

ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु

       मुंबई, दि. 24 : सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी NATIONAL PORTAL FOR TRANSGENDER PERSONS https://transgender.dosje.gov.in हे राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे.
          तरी मुंबई शहर जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना या पोर्टलवर तात्काळ आपली नोंदणी करावी, असे आवाहन समाधान इंगळे, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, मुंबई शहर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.