चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बेस्ट इनोव्हेटिव्ह आयडिया फ्रॉम वेस्ट प्रदर्शन

चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे बेस्ट इनोव्हेटिव्ह आयडिया फ्रॉम वेस्ट प्रदर्शन

चंद्रपूर, ता. २२ : आजादी का अमृत महोत्सव मोहिमेअंतर्गत चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे बेस्ट इंनोव्हेटिव्ह आयडिया फ्रॉम वेस्ट (कचर्‍यापासून नाविन्यपूर्ण संकल्पना) प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिका चंद्रपूरतर्फे “आजादी का अमृत महोत्सव” मोहिमेअंतर्गत दिनांक 10 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत बेस्ट इंनोव्हेटिव्ह आयडिया फ्रॉम वेस्ट (कचर्‍यापासून नाविन्यपूर्ण संकल्पना) या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत बेस्ट इनोव्हेटिव्ह आयडिया फ्रॉम वेस्ट (कचर्‍यापासून नाविन्यपूर्ण संकल्पना) साहित्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे.

सदर साहित्य प्रदर्शनीमध्ये निवडक साहित्यानाच संधी मिळणार आहे. यासाठी बेस्ट इंनोव्हेटिव्ह आयडिया फ्रॉम वेस्ट (कचर्‍यापासून नाविन्यपूर्ण संकल्पना) यावर आधारित प्रकल्प तयार करून aspm4ngo@gmail.com या मेल आयडीवर ऑनलाइन पद्धतीने दिनाक 22 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत अपलोड करावी. मेल आयडीवर प्राप्त झालेल्या एकूण प्रकल्पापैकी उत्कृष्ट अशा प्रकल्पांची निवड दिनांक 29 सप्टेंबर 2021 ला करण्यात येईल. दिनांक 1 ऑक्टोबर 2021 ला निवडलेले  प्रकल्प साहित्य ऑफलाईन पद्धतीने प्रदर्शनीमध्ये मांडण्यात येईल.

यात गट अ- शाळा व महाविद्यालयीन विध्यार्थी, गट ब- इतर नागरिक गटातून निवडक प्रकल्पातून प्रथम व द्वितीय क्रमांकाचे प्रकल्प निवडण्यात येईल. बेस्ट  इनोव्हेटिव्ह  आयडिया फ्रॉम वेस्ट (कचर्‍यापासून नाविन्यपूर्ण संकल्पना) यावर प्रकल्प तयार करताना सदर संकल्पना ही नाविन्यपूर्ण असणे गरजेचे आहे. प्लास्टिक कचरा, इ कचरा, हजार्डस (hazards) यांचा वाढत जाणारा कचरा व त्यामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास यावर उपाययोजना याचा वापर नाविन्यपूर्ण संकल्पनेत करावा. घरच्या घरी ओला विघटनशील कचऱ्याचे विघटन करण्याची सोपी, नाविन्यपूर्ण, कमी खर्चिक पद्धत यावर नाविन्यपूर्ण प्रकल्प याचा वापर संकल्पनेत करावा. मेल आयडीवर शक्य असल्यास नाविन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित छायाचित्र सुस्पष्ट दिसेल अशा पद्धतीने अपलोड करावे. बेस्ट इंनोव्हेटिव्ह आयडिया फ्रॉम वेस्ट (कचर्‍यापासून नाविन्यपूर्ण संकल्पना) याची माहिती सुमारे 100 ते 150 शब्दात लिहावी.बेस्ट इंनोव्हेटिव्ह आयडिया फ्रॉम वेस्ट (कचर्‍यापासून नाविन्यपूर्ण संकल्पना) माहिती लिहिताना संकल्पनेचे  नाव, वापरणारे साहित्य, कार्यपद्धती, खर्चाचे विवरण, उपयोगिता, आपले नाव, विद्यार्थी असल्यास शाळा/ विद्यालय/ महाविद्यालयाचे नाव, मोबाइल क्र. इत्यादी स्वरूपात माहिती असणे अपेक्षित आहे. अधिक माहितीसाठी 9511229828 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा.