जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यासाठी अर्ज आमंत्रित

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर, दि. 4 : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 या कायद्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी तसेच सर्व 21 प्रकारच्या दिव्यांग व्यक्तिंना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी गरजेनुसार, पुनर्वसनात्मक सहाय्यभुत सेवा विहित कालावधीत मिळण्याकरीता दिव्यांग सक्षमीकरण विभाग, सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकारच्या स्कीम फॉर इंप्लीमेंटशन ऑफ राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॲबिलीटी ॲक्ट 2016 योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तिकरीता शासनमान्य ‘जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र’ स्थापन करावयाचे आहे. या पुनर्वसन केंद्रामार्फत दिव्यांग व्यक्तिंना विविध सोयी सुविधा आणि साहित्य साधने वितरण इत्यादी विविध पुनर्वसनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करणे अभिप्रेत आहे.

जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविण्यासाठी अटी व शर्ती पूर्ण करणा-या संस्थांनी 18 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयात अर्ज सादर करावेत. अधिक माहिती http://zpchandrapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी सुरेश पेंदाम यांनी कळविले आहे.