एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू Ø ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अतिंम मुदत 25 सप्टेंबरपर्यंत

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू

Ø ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अतिंम मुदत 25 सप्टेंबरपर्यंत

चंद्रपूर, दि. 15 सप्टेंबर : आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित इंग्रजी माध्यमाच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल मधील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 6वी च्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता 7 ते 9 वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसूचित, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. त्याकरीता  https://admission.emrsmaharashtra.com ही  लिंक  उपलब्ध  करुन  देण्यात आली  आहे.
  प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी दिलेल्या लिंकवर आवेदनपत्र ऑनलाईन भरुन त्यासोबत मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावयाचे आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टलवरील विद्यार्थी आयडी व मोबाईल क्रमांक (ओटीपी करिता) आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याबाबतची सविस्तर माहिती लिंकवर देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची अंतिम मुदत दि. 25 सप्टेंबर 2021 पर्यंत असणार आहे.
तरी अनुसूचित, आदिम जमातीच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा येथील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प कार्यालय, चिमूर येथे संपर्क करावा. असे आवाहन चिमूर, आदिवासी विकास विभागाचे, प्रकल्प अधिकारी के.ई. बावनकर यांनी केले आहे.