शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना

शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना

गडचिरोली, दि.27: डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला येथे विकसित झालेले तंत्रज्ञान सुधारीत वाण इत्यादिंचा शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्या समन्वयातुन प्रसार व प्रचार होण्याकरीता डॉ.एम.आर.गडाख कुलगुरु डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला यांच्या संकल्पनेतुन विदर्भात डॉ.पं.दे.कृ.वि.परिसरात स्थापना करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.त्यानूसार कृषि महाविद्यालय आणि संशोधन केंद्र सोनापूर,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉल येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची स्थापना दिनांक 19 जानेवारी 2023 ला करण्यात आली. या मंचाच्या स्थापनेतुन विद्यापिठाचे संशोधन कार्य शेतकऱ्यापर्यत पोहचवून देशाच्या पोशिंदयास सक्षम करणे व कृषि विकासाला चालना देणे याबाबत चर्चा करण्यात आली. या सभेत सहयोगी अधिष्ठाता,कृषि महाविद्यालय, सोनापूर-गडचिरोली, डॉ.माया राऊत यांनी मंच स्थापनेमुळे शेतकऱ्यांना सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती होऊन तंत्रज्ञानामुळे शास्त्रोक्त पध्दतीने उत्पन्न वाढविण्यावर भर दिला तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाण्याचे नियोजन,किड व रोग व्यवस्थापन करुन उत्पन्नात वाढ करण्यावरती मार्गदर्शन केले. तसेच सहयोगी प्राध्यापक,उद्यानविद्या कृषि संशोधन केंद्र,सोनापूर-गडचिरोली,डॉ.युवराज खोब्रागडे यांनी सदर मंच स्थापनेची उद्देश व महत्व सांगितले. मंच उद्घाटन सभेस सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे मत मांडुन मंच स्थापनेचे स्वागत केले. या कार्यक्रमास आरमोरी,गडचिरोली तहसिल येथिल शेतकरी उपस्थित होते. सदर कार्यक्रमास विभाग प्रमुख,वनस्पतीशास्त्र, डॉ.शांती पाटील, कृषिविद्यावेत्ता,डॉ.प्रविन महातळे, कृषि अर्थशास्त्र,डॉ.शुभागी अलेक्झांडर यांनी मार्गदर्शन केले. तर मंचाचे अध्यक्ष, प्रभाकर लाकडे आणि उपाध्यक्ष,चंद्रशेखर मुर्तेली व इतर शेतकरी उस्फुर्तपणे सहभागी झाले. संचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक,कृषि विद्यावेत्ता, मिलिंद येनप्रेड्डिवार यांनी केले.