पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 14 सप्टेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि. 16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, भद्रावती येथे आगमन, सकाळी 10.10 वाजता सेलिब्रेशन हॉल, भद्रावती येथे पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12 वाजता भद्रावती येथून यवतमाळकडे प्रयाण.

शुक्रवार दि. 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे आगमन, सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे नगर परिषद ब्रह्मपुरी क्षेत्रातील पट्टे वाटपासंदर्भात आढावा बैठक, सकाळी 11:30 वाजता अॅन्युटी व एशिएन बँकेच्या योजनेअंतर्गत ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील प्रस्तावित रस्त्याकरीता पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याबाबत आढावा बैठक, दुपारी 12.15 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता संदर्भाने आढावा बैठक, दुपारी 12.30 वाजता ओबीसी विद्यार्थ्यांकरीता स्वाधार योजना राबविण्याबाबत आढावा बैठक, दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भाने आढावा बैठक. दुपारी 1.30 ते 2 वाजेपर्यंतचा वेळ राखीव.

दुपारी 2 वाजता  खरीप हंगामातील परिस्थिती व रब्बी हंगामाचे नियोजनासंदर्भात आढावा बैठक, दुपारी 2.30 वाजता शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी येथे चंद्रपूर जिल्ह्यातील कोविड-19 संदर्भात आढावा बैठक, दुपारी 3 वाजता ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार मिळण्यासाठी फिरता दवाखाना (मोबिव्हॅन) लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती, दुपारी 3.30 वाजता सी.एस.आर निधी अंतर्गत प्रस्तावित कामासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक, सायंकाळी 4.30 वाजता ब्रह्मपुरी येथून गडचिरोलीकडे प्रयाण.