मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम व सुधारित बीज भांडवल योजना

मुख्यमंत्री रोजगार निर्मीती कार्यक्रम व सुधारित बीज भांडवल योजना

भंडारा, दि.25:- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत भंडारा जिल्ह्यात सन 2021-2022 करिता जिल्हा उद्योग केंद्रास 68 व खादी ग्रामोद्योग मंडळास 36 असे 104 प्रकरणांचे उदिष्ट प्राप्त झाले असून या योजनेअंतर्गत सेवा क्षेत्रातील प्रकरणास 10 लक्ष तर उत्पादन करणाऱ्या प्रकल्पास 50 लक्ष पर्यंत कर्जासाठी अर्ज करता येतो. या योजनेसाठी maha-cmegp.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे.

 तसेच जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुधारित बीज भांडवल योजना राबविली जात असून सदर योजनेत सेवा, उत्पादन व इतर व्यवसायाकरिता रुपये 25 लक्ष प्रकल्प किमतीकरिता कर्जासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. या योजनेसाठी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयात फॉर्म उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र प्रशासकीय भवन, नॅशनल हायवे क्रमांक 6 भंडारा येथे संपर्क साधावा.