पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 11 सप्टेंबर : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि. 12 सप्टेंबर 2021 रोजी  सकाळी 10 वाजता ब्रह्मपुरी येथून खेडी ता. सावलीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता खेडी ता. सावली येथे आगमन व बस स्टॉप ते खेडी गावातील मुख्य रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, खेडी येथील सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन, तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा,

दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत सावली येथे आगमन व पालकमंत्री जनसंपर्क कार्यालय येथे नागरिकांसोबत चर्चा, दुपारी 2.30 वाजता अंतरगाव ता. सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट, दुपारी 3 वाजता निफंद्रा ता. सावली येथे आगमन व सदिच्छा भेट, दुपारी 3.30 वाजता पाथरी ता. सावली येथे आगमन व सांत्वनपर भेट

सायंकाळी 4 वाजता गुंजेवाही ता. सिंदेवाही येथे आगमन, सायंकाळी 5.30  वाजता गुंजेवाही ता.सिंदेवाही येथून नागपूरकडे प्रयाण.