अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचा अभ्यासवर्ग  वाशिम येथे संपन्न

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचा अभ्यासवर्ग  वाशिम येथे संपन्न

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांताचा अभ्यासवर्ग वाशीम येथे आयोजित करण्यात आला होता. या वर्गाला अभाविप राष्ट्रीय संघटन मंत्री आशिषजी चौहान, क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्तजी जोशी, जनजाती छात्रकार्य प्रमुख गोबिंदजी नायक, विदर्भ प्रांत संघटनमंत्री विक्रमजीतजी कलाने, विदर्भ प्रांत मंत्री अखिलेशजी भारतीय, विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रा.योगेशजी येणारकर यांची विशेष उपस्थिती होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा अभ्यासवर्ग कार्यकर्त्यांना प्रशिक्षण,गुणवत्ता,राष्ट्रहित सामाजिकहित जोपासने तसेच समाजातील समस्या सोडवने आणि सैधांतिक कार्यपद्धति या विषयासाठी होता. कोरोनाकाळ महामारी असल्यामुळे गेल्या 2 वर्षापासून हा अभ्यासवर्ग स्थगीत करून परिषदेचेच्या कार्यकर्त्यांनी कोरोना रुग्णांना शक्य तेवढी मदत पोहचवने प्लाज्मा आणि रक्तदान शिबिर घेणे ग्रामीण तसेच भागात जनजागृति करने विविध अभियान करने इत्यादी सामाजिक उपक्रम राबविले.या अभ्यासवर्गात पूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्या मधुन जिल्हातील प्रमुख कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते या वेळी काही संघटनात्मक घोषणा करण्यात आल्या

अकोला विभाग प्रमुख म्हणून प्रा.डॉ.राजीव बोरकर ( अकोला ), वाशिम जिल्हा प्रमुख म्हणून प्राध्या. सुरेश मापारी, वाशिम जिल्हा संयोजक म्हणून राहुल खरात यांची घोषणा करण्यात आली.तसेच इतर जिल्हातील संघटनात्मक घोषणा सुद्धा करण्यात आल्या.