आपल्या गावात,परिसरात नविन महिला किंवा पुरुषांपासून सावधान – युनूसभाई शेख

आपल्या गावात,परिसरात नविन महिला किंवा पुरुषांपासून सावधान – युनूसभाई शेख

सिंदेवाहि तालुक्यातील अति वरदळ असलेल्या गावांमध्ये काही अपरिचित आणि अनोळखी लोकांचा भटकंती, सहवास, परिचलन, दिनचर्या ही विविध व्यावसायिक वेषभुशे द्वारे, विविध प्रकारच्या व्यवसायाद्वारे, ससेहोलपट जीवनचर्या, भटकी दिनचर्या इत्यादि वाढलेली निदर्शनास येत आहे.

कोरोना नामक महामारिचे संकट संपता-संपेना, बेरोजगारीची समस्या काही दूर होईना, झोपला व्यापार काही सवरेना, आर्थिक मंदी काही संपेना, उपद्रवी उपद्व्याप कुठेच कमी दिसेना, शैक्षणिक नुकसान काही कमी होईना, विद्यार्थी जीवनाची अवदशा संपेना, स्वयंरोजगाराच्या संधि कुठेच दिसेना, गुन्हेगारी काही कमी होईना, चोरया-चकाऱ्या काही संपता संपेना, अंधश्रद्धा, अपहरण, विनयभंग, हत्या, तस्करी, बाल-गुन्हेगारी, बाल-मजूरी, भिक्षाव्रुत्ति, अवैध व्यवसाय थांबेना-ना-संपेना इत्यादि भयावह कारने आहेत..??

यामुळे आजघडिला उपरोक्त सर्वप्रकारची गुन्हेगारी प्रव्रुत्ति आपल्याकडे वाढलेली आहे, हेच मुळ कारण म्हणा किवा “विनाश काले-विपरीत बुद्धि” समझा यामुळे गुन्हेगारी जगतात वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे, याचेच परिणामस्वरूप आजघडिला विविध प्रकारचे गुन्हे आपल्या तालुक्यात, शहरात, परिसरात घडल्याचे दिसून येत आहे,
“महत्वाचे म्हणजे स्थानिक पातळीवरील सर्व प्रकारचे प्रशासन हतबल झाले आहे.
या मागील मूळ कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे लक्षात आले की, बुद्धिजीवी समाज, जनता इत्यादि श्रेणितील लोक सहकार्य करताना कुठेच दिसून येत नसल्याची खंत आहे.

आमच्या सुरक्षेची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांचे शब्दानुभावातून हे दुःख स्पष्टपने जानवले आहे.
तेव्हा आदरनिय सर्व ज्येष्ठ मान्यवर, सन्माननीय नागरिक बंधु-भगिनीनो सतर्कता आणि साधतेचा इशारा असा आहे की, आपल्या तालुक्यात, शहरात, परिसरात, प्रभागात, आवारात आपणास अश्या प्रकारचे संशयास्पद, संशयात्मक, गुन्हेगारी प्रव्रुत्तिचे व्यक्तिमत्व (महिला-पुरुष) विविध वेश-भूशेत, विविध व्यसायाच्या माध्यमातून, विविध व्यापारिक नजरेस दिसल्यास सर्व प्रथम त्याची चौकशी करा.
त्यांचे आधारकार्ड, परिचय पत्र, तपासा, त्यांचा राहन्याचा ठिकान माहित करुण घ्या, थेट घरा मध्ये प्रवेश न देता प्रवेसद्वारा समोरुणच त्यांचेशी संवाद साधा, व्यक्तिक माहिती अतिप्रमानात देवू नका, अंधश्रद्धा, देवा-धर्माच्या नावावर भावनिक होवू नका, गोपनीयता बाळगा, काही संशय असल्यास प्रथम आपल्या जवळ आजु-बाजूला राहत असलेल्या कुटुंबियाना याबद्दल माहिती द्या.

एक-दुसऱ्या च्या संपर्कात राहून या द्वारे प्रशासकीय सहकार्य मागवा, प्रशासनाची मदत घ्या, मुख्यत्वे प्रशासनास सहकार्य करा, अति महत्वाचे दूरध्वनि क्रमांक लक्षात ठेवा, आपल्या नजिक असलेल्या पोलिस विभाग, नगरपंचायत प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन, सामाजिक कार्यकर्ता, पोलिस मित्र, शांतता समिती, वार्ताहर इत्यादिशि संपर्क करा. सहकार्य ते सिद्धि याला महत्व द्या..

आपला समाज, आपला कुटुंब आपलीच जबाबदारी या घोष-वाक्यातील मर्मस्पर्शी महत्वता जानून आपले कर्तव्य पार पाडावे हीच हात पसरवून-हात जोडून विनम्रतेंची विनंती करतो आहे..
धन्यवाद…

                   आपला समाजसेवक

युनुसभाई शेख सामाजिक कार्यकर्ता, अध्यक्ष निराश्रित-निराधार लोकसेवा प्रकल्प सिंदेवाहि तालुका :- सिंदेवाहि, जिल्हा – चंद्रपुर